सखे गं मैत्रिणी ...! सखे गं मैत्रिणी !
मैत्री ही आपली दोन वर्ष पुराणी
मैत्रित सहवास, सहवासात मैत्री
नव्हतो आपण काढत कुणाची उनिदुणी ॥!
सहवासचं सुख टिकत नाही म्हणतात ----
म्हनूणच------
आपलीच माणसं काडया घालणयाचं काम करतात
मैत्रित आपल्या प्रश्न ही (?) होते,
उत्तरं तर होतीच होती ...
पण ...
काही प्रश्न अनुत्तरित राहिले
आणि काही उत्तरं प्रश्नांकित ठरली
प्रश्नांची त्यांच्या आतुरता आहे....!
पुन्हा तुझ्या सहवासाची अजून ओढ आहे
मैत्री आपली जणू वळवाचं पानी
पण टिकवायची बरं का न विसरतेपनी
म्हणशील सखे, रेखा तू खरच घाटी ...!
पण आशु, झुरते तुझ्याच सहवासासाठी
तुझ्याच मैत्री साठी ....!
रेखा शिवाजी जगताप.
१ जुलाई १९९५.
No comments:
Post a Comment