Sunday, July 6, 2008

साक्षरतेचा मंत्र

उंचवू उंच निशान अपुले ...!
उंचवू उंच निशान ...
होऊन साक्षर, राखू आपण भारतभूची शान
उंचवू उंच निशान अपुले
शिकता होईल सर्व ही सुखकर,
शिकतील महिला शिकतील बालक,
साक्षरतेच्या मंत्राचा या करुया जयजयकार ...!
उंचवू उंच निशान अपुले ......!

गाव असो वा असोत नगरी,
महल असो वा असो झोपडी,
साक्षरतेच्या या रोपाचा होईल वृक्ष विशाल,
उंचवू उंच निशान अपुले
उंचवू उंच निशान

नेईल वृक्ष हा प्रगति पथावर
सारे आपण होवू साक्षर
अभिमानाने उंचावेल मग भारत भूची मान
उंच निशान अपुले
उंचवू उंच निशान

सौ रेखा जगताप.
(साक्षरता अभियान प्रोजेक्ट करिता लिहिलेली कविता )

निवृति

वीरांगने ! असे अश्रु तू ढाळू नको !

कुरुक्षेत्री तू अशी भावविभोर होऊ नको !

पेरलेल्या तुझा स्वरांचे प्रतिसाद उमटतिल वेळाने

अनुभवाचे बोल तुझे ठरतील प्रेरक जेत्याचे

गीतेचा उपदेश आमलात आणण्याचा

प्रयत्न तू केलास ....

पण .........

पण श्रीकृषणाचा मोलाचा सल्ला तेवढा विसरलात

सामंजस्य राखून टाळले असते संघर्ष

...तर कुरुक्षेत्राच युद्ध झालच नसतं

तुमच्या विचारांना सांगड़ घालून मोल त्याच वाढलं असतं

तरीही, वीरंगाने अश्रु तू ढालू नको

कुरुक्षेत्री अशी भावविभोर होवू नको

रणांगणी तुझ्या स्म्रुतिचा दीप एक तेवत राहिल

कधी न कधी इतरांना सुद्धा

तोच प्रकाश पुरवत राहिल...



सौ रेखा जगताप