Thursday, July 17, 2008

सरस्वती जननी

(कविते बदल थोडस-- स्वर्गीय श्रीमती सरस्वती वरधराजन-- आमच्या शालेच्या विश्वस्त याना श्रधांजली म्हणून ही कविता समर्पित आहें --(निधन १९-७ २००७ ) या कवितेत त्याचा मुलांच्या व नातू आंणि पति श्री वरधराजन यांच्या नावाचा उल्लेख आहें बालासुब्रमन्यम , विजय , यश )

सरस्वती जननी


स्वतेजाने आकाशी ती तळपत होती ज्वाला



आज अचानक त्या ज्योतीचा प्रकाश मावळला....!



विद्युलातेपरी तेजाने जरी तळपत होती बाला



परी हृदयी तिच्या वसत होता वात्सल्याचा प्याला



वादळे ती किती ही आली पण.. ,

वीरांगना ती लढत राहिली,

संसाराचया रथ चक्राची ,

धुरा तिने ही कधी सोडली



कर्तृत्वाच्या शिखरावरती पतिराजा चढविला



आज अचानक त्या ज्योतीचा प्रकाश मावळला...!



सरस्वती ती विद्यादायिनी लोभस मूर्ति मधुर भाषिणी



बालासुब्रता , विजयलक्ष्मी , वरदवादिनी यशोवार्धिनी



धार्मिक सात्विक अशी ही जननी ....!



शालीनतेचा कर्त्रुत्व्याचा पांघरला शेला



आज अचानक त्या ज्योतीचा प्रकाश मावळला



स्वतेजाने सोऊ ती तळपत होती ज्वाला



आज अचानक त्या ज्योतीचा प्रकाश मावळला ...!
REKHA JAGTAP

Sunday, July 6, 2008

साक्षरतेचा मंत्र

उंचवू उंच निशान अपुले ...!
उंचवू उंच निशान ...
होऊन साक्षर, राखू आपण भारतभूची शान
उंचवू उंच निशान अपुले
शिकता होईल सर्व ही सुखकर,
शिकतील महिला शिकतील बालक,
साक्षरतेच्या मंत्राचा या करुया जयजयकार ...!
उंचवू उंच निशान अपुले ......!

गाव असो वा असोत नगरी,
महल असो वा असो झोपडी,
साक्षरतेच्या या रोपाचा होईल वृक्ष विशाल,
उंचवू उंच निशान अपुले
उंचवू उंच निशान

नेईल वृक्ष हा प्रगति पथावर
सारे आपण होवू साक्षर
अभिमानाने उंचावेल मग भारत भूची मान
उंच निशान अपुले
उंचवू उंच निशान

सौ रेखा जगताप.
(साक्षरता अभियान प्रोजेक्ट करिता लिहिलेली कविता )

निवृति

वीरांगने ! असे अश्रु तू ढाळू नको !

कुरुक्षेत्री तू अशी भावविभोर होऊ नको !

पेरलेल्या तुझा स्वरांचे प्रतिसाद उमटतिल वेळाने

अनुभवाचे बोल तुझे ठरतील प्रेरक जेत्याचे

गीतेचा उपदेश आमलात आणण्याचा

प्रयत्न तू केलास ....

पण .........

पण श्रीकृषणाचा मोलाचा सल्ला तेवढा विसरलात

सामंजस्य राखून टाळले असते संघर्ष

...तर कुरुक्षेत्राच युद्ध झालच नसतं

तुमच्या विचारांना सांगड़ घालून मोल त्याच वाढलं असतं

तरीही, वीरंगाने अश्रु तू ढालू नको

कुरुक्षेत्री अशी भावविभोर होवू नको

रणांगणी तुझ्या स्म्रुतिचा दीप एक तेवत राहिल

कधी न कधी इतरांना सुद्धा

तोच प्रकाश पुरवत राहिल...



सौ रेखा जगताप

Saturday, July 5, 2008

नको नको रे पावसा ...

असा बेभान तू होऊ

दूर गेली माझी माय

कशी येईल रे घरी

नको नको रे पावसा .....

डोळे असे रे वटारु

लखाखती दिव्य तारा

भय दाटले रे मनी

माय माझी ही गुणाची

रात दिस राबते ते ती

आम्हा मुलांचे रे सुख

दिन रात जपते ती

नको नको रे पावसा .....

असा बेभान तू होऊ

भरू आले रे आंगन

चहू दिशा झाले पाणी

झाला व्याकुळ हा जीव

माझ्या मायेच्या भेटीला

सानुला रे बंधू माझा

रडू रडून झोपला

नको नको रे पावसा ....

झाली असेल बेचैन माय माझी ही बर का

पिल्लांसाठीच तिचाही जीव सैरभैर झाला

थकु भागून माय ती घरी उशिरा येईल

डबाबल्या डोळ्यानी ती मला जवळ घेईल

मऊ मऊ दुधभात पाखरांना भरविल

मग मग रे पावसा खुपखूप रे कोसळ

माझ्या मायेच्या कुशीत सारे जग विसरिन...





रेखा जगताप
जुलाई ३, २००८
३:५० दुपारी