Monday, June 16, 2008

जोडीदार


जोडीदार

जोडीदाराची निवड करावी म्हटलं आवडीनं


आणि जगावं जीवन गुलाबी गोडीनं

विसावलं मन जोडीदाराच्या छातीवर

जसं वळवाचं पाणी हिरव्या गार पातीवर

स्वच्छंदी जीवनाचं रहस्य उमगलं

संसाराच्या वेलीवर पहिलं फुल फुललं

दवाचे थेंब ओघळून गेले

हदयाची स्पदनं निमाऊन गेले

समज गैसमज ओढवू पाहतोय

जोडीदाराची जोड सोडवू पाहतोय

गुलाबी जोडीत तडजोड आली

जोडीदाराची फक्त जोड (?) उरली...



रेखा शिवाजी जगताप. (१९९५)