Saturday, June 21, 2008

सख्या सत्यवान


सख्या सत्यवान

सख्या रे सत्यवान, तू किती भाग्यवान ..........!

सावित्रीच्या पायाखाली मात्र काटेरी रान,

काट्य़ाकुटयातून चालताना तिची होतेय वनवन,

रक्ताळतात पाय आणि ओथंबतं मन,

पुसायला अश्रु, नसतात तुझे हात,

विरहाच्या वेदनेने गलित होतात गात,

पाखरांचा टाहो घरट्याचा घाट

सावित्रीचे डोळे मात्र पहातात तुझी वाट ............!



रेखा जगताप
१८ जून २००८ ४.00 (वट पौर्णिमा)



1 comment:

Sanika N said...

Maushi khupach touchy aahe
mastach....

Pallavi Salvi(Sanika N)