नको नको रे पावसा ...
असा बेभान तू होऊ
दूर गेली माझी माय
कशी येईल रे घरी
नको नको रे पावसा .....
डोळे असे रे वटारु
लखाखती दिव्य तारा
भय दाटले रे मनी
माय माझी ही गुणाची
रात दिस राबते ते ती
आम्हा मुलांचे रे सुख
दिन रात जपते ती
नको नको रे पावसा .....
असा बेभान तू होऊ
भरू आले रे आंगन
चहू दिशा झाले पाणी
झाला व्याकुळ हा जीव
माझ्या मायेच्या भेटीला
सानुला रे बंधू माझा
रडू रडून झोपला
नको नको रे पावसा ....
झाली असेल बेचैन माय माझी ही बर का
पिल्लांसाठीच तिचाही जीव सैरभैर झाला
थकु भागून माय ती घरी उशिरा येईल
डबाबल्या डोळ्यानी ती मला जवळ घेईल
मऊ मऊ दुधभात पाखरांना भरविल
मग मग रे पावसा खुपखूप रे कोसळ
माझ्या मायेच्या कुशीत सारे जग विसरिन...
रेखा जगताप
जुलाई ३, २००८
३:५० दुपारी
Saturday, July 5, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment